Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Video : धरणावर जीवाची मौज करण्याची मस्ती नडली, पाहा हा थरार

सिंधुदुर्ग (Sindhudurg ) जिल्ह्यातील सावंतवाडी (Sawantwadi) येथील माडखोल धरणावर (Madkhol dam) जीवाची मजा करण्यासाठी गेलेला कारिवडे येथील घाडी नामक युवक वाहून गेला.  

Video : धरणावर जीवाची मौज करण्याची मस्ती नडली, पाहा हा थरार

रत्नागिरी : सिंधुदुर्ग (Sindhudurg ) जिल्ह्यातील सावंतवाडी (Sawantwadi) येथील माडखोल धरणावर (Madkhol dam) जीवाची मजा करण्यासाठी गेलेला कारिवडे येथील घाडी नामक युवक वाहून गेला. आज दुपारी तीन वाजण्याचा सुमारास ही घटना घडली. पाण्याचा प्रवाहासोबत तो युवक वाहून गेला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी गेलेले स्थानिक गोविंद शेटकर पाण्याचा प्रवाहासोबत ओढले गेले आणि...   

पाण्याचा जोर एवढा होता की बचाव कार्यात व्यत्यय येत होता. स्थानिक ग्रामस्थांनी दोरीचा सहाय्याने बचाव कार्यास सुरुवात केली. जीवन केसरकर, सुनील केसरकर, गोविंद शेटकर, सामंत, विनोद सावंत, शुभम सावंत, कृष्णा राऊळ, अक्षय लात्ये, अप्पा राऊळ यांनी त्या युवकाचा जीव वाचवला. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांची चाहूल लागताच बुडणाऱ्या त्या युवकाने घटनास्थळावरून पळ काढला. सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सखाराम भोई, सुनील नाईक, भुषण भोवर आदींनी रेस्क्यु कीटसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्या आधी ग्रामस्थांचा मदतीने त्या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. 

Read More