Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तडीपारीची मुदत संपवून छिंदम शहरात दाखल, महाराजांसमोर नतमस्तक

 महापालिका निवडणूक निकालात छिंदम यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना पराभूत केलं

तडीपारीची मुदत संपवून छिंदम शहरात दाखल, महाराजांसमोर नतमस्तक

अहमदनगर : शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महाराजांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत पापक्षालनाचा प्रयत्न केलाय. सोमवारी महापालिका निवडणूक निकाल लागले. अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले छिंदम विजयी झाले. त्यानंतर बुधवारी त्यांची तडीपारीची मुदत संपली. 

शहरात येताच प्रथम त्यांनी आपल्या कार्यालयातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचंही छिंदम यांनी पूजन केलं. 

सोमवारी, १० डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या महापालिका निवडणूक निकालात छिंदम यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना पराभूत केलंय. प्रभाग क्रमांक ९ क मधून श्रीपाद छिंदम यांचा विजय झाला आहे.

महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य 

या वर्षीच्या सुरुवातीलाच शिवजयंतीच्या तोंडावरच महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना छिंदम यांनी शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीपाद छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपमधून बडतर्फ करण्यात आलं तसेच त्यांची उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती... 

Read More