Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Shirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!

AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.

Shirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!

Shirdi News: साईबाबांच्या (Saibaba) दर्शनासाठी तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून भक्तांची आता सुटका होणार आहे. साईबाबा संस्थानने तब्बल 109 कोटी रूपये खर्चून बांधलेले अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स (Darshan Complex) लवकरच सुरू होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक हजेरी लावत असतात. त्यांना साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शनरांगेत उभं रहावं लागतंय. आता मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Shri Saibaba Sansthan Trust build 109 Crores AC Darshan Complex Shirdi marathi News)

अत्याधुनिक दर्शनरांग ही संपूर्ण वातानुकूलीन (AC Darshan Complex) असून साईभक्‍तांच्या सुरक्षेची विशेष काळजी यात घेण्यात आलीय. शिर्डीत आल्यानंतर भक्तांना दर्शनपास कांऊटर, लॉकर, चप्पल स्टॅण्ड ,लाडू कांऊटर, डोनेशन कांऊटर, ऊदी स्टॉल, टॉयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. आता मात्र एकाच छताखाली सर्वकाही सुविधा करण्यात आल्या आहेत. 

साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत. जिथं भक्तांना बसता येईल आणी आल्हाददायक दर्शन कसं दिलं जाईल याची विशेष काळजी घेण्यात आलीये, असं साईमंदिरचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव (Rahul Jadhav) यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा - Maharashtra Kesari : महाराष्ट्रातील पैलवानांसाठी महत्त्वाची बातमी, कारवाईबाबत मोठी माहिती समोर!

दरम्यान, साईबाबा संस्थानचा हा महत्वकांशी प्रकल्प असून तिरूपती बालाजीच्या (Tirupati Balaji) धर्तीवर त्यांच्यापेक्षाही सुसज्ज अशी ही दर्शनव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेऊन शिर्डीत ही दर्शन व्यवस्था, शैक्षणिक संकुल आणि निळवंडे धरणाचे लोकार्पण करण्याचे त्यांना निमंत्रण दिलं आहे. साधारण मार्च महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हणलंय.

Read More