Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! शिवजयंती दिनी उदय सामंत यांनी घेतला निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तीमत्व कायम नव्या पिढीसमोर रहावं हा उद्देश

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! शिवजयंती दिनी उदय सामंत यांनी घेतला निर्णय

मुंबई : शिवराज्याभिषेक दिन (ShivrajyaBhishek Din) प्रत्येक महाविद्यालयात साजरा करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी घेतलाय. राज्यातल्या सर्व शासकीय, खासगी विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. राज्याला आणि देशाला दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचं व्यक्तीमत्व कायम नव्या पिढीसमोर रहावं या उद्देशाने निर्णय घेण्यात आलाय.

शिवजयंती उत्साहात 

शिवनेरी गडावर शिवजन्मसोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. प्रथेप्रमाणे शिवरायांना पोलीस दलाकडून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने शिवरायांचा पाळणा गात बाल शिवरायांचे पूजन करण्यात आले. जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं. ढोलताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

शिवरायांना अभिवादन 

शिवजयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवरायांना अभिवादन केलं. मुंबईत शिवाजी पार्क इथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपालांनी हार अर्पण करत अभिवादन केलं. शिवरायांच्या स्वप्नातला देश साकार व्हावा अशी प्रार्थना राज्यपालांनी केली. राज्यपालांसह शिवाजी पार्कवर महापौर किशोरी पेडणेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. 

Read More