Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्या संपर्कात?

...तर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्या संपर्कात?

सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. शिवेंद्रराजेंचं घराणं स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत आहे. मागील सलग तीन टर्म शिवेंद्रराजे साता-यातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहे. याआधी भाजपने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले तर आनंदच होईल, असं त्यांनी म्हटलं होतं.

साताऱ्यातील राजकारण हे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याभोवतीच फिरतं. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात सर्व काही ठीक आहे. असं ही नाही. दोघांमधील वाद नवा नाही. एकमेकांवर टीका करण्याची संधी ते सोडत नाहीत. आणि समोर आले तर एकमेकांनाही भेटतात.
 
2002 मध्ये झालेल्या सातारा पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे आमने-सामने होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 9 पैकी 6 जागांवर उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने विजय मिळवला होता.

2004 च्या लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेतलं. ज्यामुले राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. विधानसभा निवडणुकीत मात्र शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता.

आज इतक्या वर्षानंतरही दोघेही एकाच पक्षात असले तरी त्यांचं कधी जमलं नाही. उद्यनराजे भोसले हे भाजपमध्ये आले नाही. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न असू शकतो. पण सध्या तरी या राजकीय चर्चा आहेत. यावर त्यांचं अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.

Read More