Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी...

कोल्हापूरकरांची मान अभिमानाने ताठ होईल अशी बातमी समोर आली आहे

कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांची मान अभिमानाने ताठ होईल अशी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे. 

  कोल्हापूरकर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 
 
 संशोधनातील कामगिरी, विद्यार्थिमुख आणि नाविण्यपूर्ण उपक्रम यामुळे नॅक मानांकनात विद्यापिठाला A++ असे सर्वोच्च गुण मिळाले आहेत.
 
 विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी यूजीसी कडून दिल्या जाणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या अनुदानासाठी शिवाजी विद्यापीठ पात्र ठरलं आहे.
 
 विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या योगदानाचा यामध्ये महत्वाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू ड्रॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केलीय.

Read More