Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

खोपोलीत शिवसेनेला धक्‍का, नगरसेविका माधवी रिठे यांचे पद रदद

 शिवसेनेच्‍या नगरसेविका माधवी लक्ष्‍मण रिठे यांचे पद रद्द

खोपोलीत शिवसेनेला धक्‍का, नगरसेविका माधवी रिठे यांचे पद रदद

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : खोपोली नगरपालिकेत शिवसेनेला धक्‍का बसलाय. शिवसेनेच्‍या नगरसेविका माधवी लक्ष्‍मण रिठे यांचे पद रायगडच्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांनी रदद केले आहे. पतीच्‍या नावावर असलेल्‍या दोन वाहनांची माहिती रिठे यांनी लपवणे त्यांना महागात पडलंय. ही दोन्‍ही वाहने खोपोली नगरपालिकेच्‍या कचरा संकलन आणि वाहतूकीसाठी साईगणेश इंटरप्रायझेस या ठेकेदाराकडे भाडेतत्वावर होती आणि त्‍याचे भाडेदेखील पतीला ठेकेदार कंपनीने अदा केल्‍याचे हे सिदध झाले आहे.

कचरा सकंलन करुन कचऱ्याच्या वजनाद्वारे मोजमाप करुन खोपोलीच्या मिळ येथील घनकचरा प्रकल्प येथे वाहतुक करण्याच्या स्पष्ट झाले. त्याकारणाने लक्ष्मण रिठे यांना ठेकेदाराकडुन योग्य तो मोबदला अदा करण्यात आल्याचे समोर आले आहे. या बाबतीत नगरपालिकेने घेतलेल्‍या ठरावावर माधवी रिठे ठरावाच्‍या बाजूने मतदान केले होते .

यासंदर्भात खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे आणि मनोज माने यांनीरायगड जिल्हाधिकारी याच्यांकडे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपचांयती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये १३ डिसेबंर २०१७ रोजी तक्रार अर्ज केला होता. त्‍यावर सुनावणी पूर्ण झाली असून माधवी रिठे यांना नगरसेवक म्‍हणून राहण्‍यास अपात्र ठरवण्‍याचा निर्णय जिल्‍हाधिकारी यांनी दिलाय .

Read More