Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट राडा, उदय सामंत गाडी हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक

Shiv Sainik vs Shinde group Rada in Pune : शिंदे गटात दाखल झालेले आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात हल्ला झाला होता. याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे.

शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट राडा, उदय सामंत गाडी हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक

पुणे : Shiv Sainik vs Shinde group Rada in Pune : उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट असा राडा झाला. शिवसैनिकांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांवर हल्ला केला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सभा कात्रजमध्ये सुरू असताना तिथून सामंत यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. सिग्नलला सामंतांची गाडी उभी असताना, शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांवर हल्ला करुन गाडीच्या काचा फोडल्या.  याप्रकरणी सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनाही अटक करण्यात आलीय. त्यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय 15 जणांना गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शिंदे गटात दाखल झालेले आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात हल्ला झाला होता. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांची पहिली अटक झाली. दरम्यान, मोरे यांनी ट्विट करत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे म्हटले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे, असे ट्विट शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केले आहे. तसेच आमच्यावर गंभीर आरोप करुन गजानन थरकुडे, संभाजीराव  थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे , विशाल धनवडे, अनिकेत घुले, रुपेश पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यावर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती  शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.

 पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट असा राडा झाला होता. शिवसैनिकांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांवर हल्ला केला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा कात्रजमध्ये सुरु असताना तिथून सामंत यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. सिग्नलला सामंतांची गाडी उभी असताना, शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांवर हल्ला करुन गाडीच्या काचा फोडल्या.

कात्रजमधून जिथे आदित्य ठाकरे जाहीर सभा घेत होते तिथे शिंदे यांचा ताफा गेल्यानंतर काही मिनिटांत सामंत यांची कार जात होती. भाषण आटोपून ठाकरे सभास्थळावरून निघून गेल्याने शिवसैनिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सामंत यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने माजी मंत्र्यांच्या कारच्या खिडकीच्या काचा फुटल्या.

सामंत ज्या गाडीत समोरच्या सीटवर बसले होते त्या वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करताना मोठ्या जमावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जमाव सामंत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात “देशद्रोही” अशा घोषणा देताना दिसत आहे. सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्याला या घटनेची माहिती नाही.

गाडीवरील हल्लाप्रकरणी सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा हल्ला पूर्वनियोजित होता. अशा भ्याड हल्ल्याला आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी 'झी 24तास'शी बोलताना व्यक्त केली. पोलिसांनी या हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. 

दरम्यान, उदय सामंतांवर हल्ला करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 'दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही'. चिथावणी देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते.

Read More