Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दीड लाख मतांनी जिंकल्यावर शरद पवारांच्या खासदाराने अजित पवारांना डिवचलं; त्यांचाच Video शेअर करत..

Sharad Pawar Candidate Win Shared Ajit Pawar Video: अजित पवार गटाच्या उमेदवाराला दीड लाखांहून अधिक मतांनी पराभूत केल्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने अजित पवारांचाच आव्हान देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

दीड लाख मतांनी जिंकल्यावर शरद पवारांच्या खासदाराने अजित पवारांना डिवचलं; त्यांचाच Video शेअर करत..

Sharad Pawar Candidate Win Shared Ajit Pawar Video: पुण्यातील शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंनी विजय मिळवला आहे. अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. अमोल कोल्हेंनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना धूळ चारली आहे. कोल्हे 1 लाख 54 हजार मतांनी विजयी झाले आहेत. ही निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. याच पार्श्वभूमीवर विजय मिळवल्यानंतर कोल्हेंनी चक्क त्यांचे विरोधक असलेल्या अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

"मी दिलेला उमेदवार निवडणूनच आणतो", "अजित पवार जेव्हा चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला कळेल" असं अजित पवार व्हिडीओत दिसत आहेत. फडणवीसही एका भाषणात, "ते चांगले कलावंत आहेत, नाटककार आहेत. सिने कलाकरा आहेत. पण ते चांगले कलाकारच आहेत खासदार होऊ शकले नाहीत," असं म्हणताना दिसत आहेत. पुढे व्हिडीओमध्ये शरद पवार, जयंत पवार आणि सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत. तसेच आदित्य ठाकरेही या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हेंचं कौतुक करताना दिसत आहेत. याचप्रकारे या व्हिडीओत बाळासाहेब थोरात यांनीही अमोल कोल्हेंचं कौतुक केलं आहे. 

कॅप्शनमध्ये काय म्हणाले आहेत कोल्हे?

"आव्हान सोपं नव्हतं... दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ... हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं," अशी कॅप्शन देत अमोल कोल्हेंनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिताना, "मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बळ दिलं आणि शिवजन्मभूमीच्या सर्व निष्ठावान मावळ्यांनी निकराचा लढा दिला," असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

पोस्टच्या शेवटी अमोल कोल्हेंनी, "हा विजय मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाविकास आघाडीच्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समर्पित करतो" असं म्हटलं आहे. 

Read More