Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शिर्डी : साईंचरणी सेवेत असणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाने उचललं 'हे' पाऊल

२२ मार्चच्या लॉकडाउनपासून देशातील आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. 

शिर्डी : साईंचरणी सेवेत असणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाने उचललं 'हे' पाऊल

मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगात वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामधील एक म्हणजे लॉकडाऊन. २२ मार्चच्या लॉकडाउनपासून देशातील आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. याचा फटका सर्वच स्तरांतील संस्थानांना बसला आहे. धार्मिक स्थळांच्या दान पेट्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे कसे असा मोठ्या प्रश्न मंदिर प्रशासनाला पडला आहे. तेव्हा अशा आणीबाणीच्या काळात शिर्डी संस्थानाने गुंतवणुकीच्या आलेल्या पैशातून कर्मचाऱ्यांना वेतन दिले असल्याचं सांगण्यात येत आहे. 

साई संस्थानाने वेळो वेळी ठरावीक रक्कमेची गुंतवणुक केलेली आहे. त्याची एक एक वर्षाची मँच्युरीटी संपत असते. एप्रिल महीन्याचा सुमारे सात कोटीचा पगार मँच्युरीटी संपलेल्या अश्याच एका एफडीच्या पैशातुन करण्यात आला आहे.  पगारासाठी मुदतीच्या आधीच एफडी मोडण्याची वेळ आली नाही किंवा येणारही नाही असं साई संस्थानचे मुख्य लेखापाल यांनी सांगीतलं आहे

त्याचप्रमाणे सर्वात जास्त देणग्या मिळणाऱ्या आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिराच्या दान पेटीला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. या देवस्थानाला दरमहा सुमारे २०० कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. या मंदिरात २२ हजार कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन आणि इतर गोष्टींवर ११० कोटी रूपये महिन्याला खर्च करण्यात येतो. त्यामुळे मंदिर प्रशासन हा भलामोठा खर्च भागवण्यासाठी एफडी किंवा सोन्याऐवजी दुसरा मार्ग शोधत आहे.

Read More