Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

साईभक्तांसाठी मोठी बातमी; 1 मे रोजी शिर्डीला जायचा बेत आखताय? आधी 'ही' बातमी वाचा

Shirdi Saibaba Mandir : सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं म्हणणाऱ्यांपैकी अनेकांचेच पाय शिर्डीच्या साईमंदिराच्या दिशेनं वळतात. मोठ्या संख्येनं इथं साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. पण, 1 मे रोजी बेत आखताय, तर आधी हे वाचा...   

साईभक्तांसाठी मोठी बातमी; 1 मे रोजी शिर्डीला जायचा बेत आखताय? आधी 'ही' बातमी वाचा

Shirdi Saibaba Mandir : शिर्डीचे साईबाबा देशोदेशीच्या भाविकांसाठी पूजनीय. अशा या साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दर दिवशी असंख्य भाविकांची रांग लागल्याचं पाहायला मिळतं. त्यातही सुट्टीच्या दिवशी इथं येणाऱ्यांची संख्या दुपटीनं वाढते. यंदाच्या आठवड्याअखेरही हीच परिस्थिती दिसून येऊ शकते. कारण, शनिवार रविवारची आठवडी सुट्टी आणि 1 मे रोजी कामगार दिन/ महाराष्ट्र दिनाची सुट्टी पाहता अनेकांचेच पाय शिर्डीच्या दिशेनं वळतील. तुम्हीही असाच बेत आखत असाल, दोनदा विचार करा. 

कारण, 1 मे रोजी शिर्डीतील ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा पवित्रा घेतला आहे. शिर्डीच्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने साई मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. साईबाबा मंदिरातील सुरक्षा व्यवस्था साई संस्थान कर्मचारी करतात तर मंदिर परिसराच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिसांची कुमक नेमण्यात आली आहे. याचबरोबरीने दररोज बॉम्ब शोधक पथकाडून मंदिराची तपासणी केली जाते. 

हेसुद्धा वाचा : Indian Railway कडून प्रवाशांसाठी अवघ्या 25 रुपयांत Top class सुविधा, पाहा कसा घ्याल फायदा 

 

सुरक्षेबाबत ही काळजी घेतली जात अससतानाच CISF ची सुरक्षा साईबाबा मंदिराला असावी अशी चर्चा होत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. साई मंदिराला CISF ची सुरक्षा लागू होणार याच कारणामुळे शिर्डीत 1 मे रोजी 'शिर्डी बंद' ची हाक देण्यात आली आहे. 

1 मे रोजी शिर्डीत काय सुरु काय बंद? 

1 मे रोजी शिर्डीत साईबाबा मंदिर भाविकांनासाठी खुले राहणार आहे. साईबाबा संस्थानचे सर्व भक्त निवासही यावेळी सुरू राहतील. साईबाबा प्रसादलय, भोजनालयही सुरू असेल. तसेच साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांसाठी सुरू राहणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी गेस्ट हाऊस, लॉजिंग सुरू ठेवणार. पण, शिर्डीतील इतर व्यवसाय मात्र पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार आहे. 

काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या? 

साईबाबा मंदिराला CISF सुरक्षा व्यवस्था नको, आहे तीच सुरक्षा योग्य आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद IAS अधिकारीकडे नको हे पद रद्द करून, शासनाचा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकारीकडे असावे अशी शिर्डीकरांची मागणी आहे. याशिवाय साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेले तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असुन सर्व निर्णय प्रलंबित आहे. यावर तोडगा म्हणून राज्य शासनानं नियुक्त समिती नेमून शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणुक करण्यात ज्यामध्ये शिर्डीतील 50 टक्के विश्वस्त नेमणूक असेल असाही सूर आहे.

Read More