Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तुम्ही शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले 'मी 100 टक्के...'

Sharad Pawar Baramati : गेल्या वर्षी मटण खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणं टाळलं. नुकताच जैन मुनींनी पवारांना विचारलं, तुम्ही शाकाहारी की मांसाहारी?

तुम्ही शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले 'मी 100 टक्के...'
Updated: Jun 12, 2024, 10:19 AM IST

Sharad Pawar Baramati : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज दुष्काळाचा पाहणी दौरा करताय. पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात त्यांचा हा दुष्काळ पाहणी दौरा असणारेय. त्यापूर्वी शरद पवार यांनी मंगळवारी 11 जूनला मध्य प्रदेशातून बारामतीत आलेल्या जैन समाजाच्या जैन मुंनीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही उपस्थितीत होते. यावेळी जैन मुंनी आणि शरद पवार यांच्यामध्ये जैन धर्माविषयी चर्चा झाली. 

शरद पवार शाकाहारी की मांसाहारी? 

गेल्या वर्षी मटन खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणं टाळलं. तरीदेखील अनेकांना प्रश्न पडला होता की, शरद पवार हे शाकाहारी आहेत की मांसाहारी. हाच प्रश्न मुंनी यांनाही पडला होता, त्यांनी शरद पवार यांना विचारलं की, तुम्ही मांसाहारी की शाकाहारी?

शरद पवार म्हणाले की...

मुंनीच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. याआधी मी शाकाहारी नव्हतो. पण गेल्या एक वर्षापासून मी पूर्णत: शाकाहारी झालो आहे.'

शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर 

शरद पवार पुढे म्हणाले की, आज आनंदाचा दिवस असून दुष्काळी दौऱ्यासाठी मी निघतो तेव्हाच पावसाला सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगलं वर्ष आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. 


'यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादन दोन नंबरला असून राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही. महाराष्ट्रामध्ये साखरेचे उत्पादन जास्त झालं तरी केंद्र सरकारने निर्बंध आणले. त्यांना मी सांगितले होते निर्बंध आणू नका. मला सांगण्यात आले की, निवडणूक होईलपर्यत आम्ही तुमचे ऐकणार नाही.' असंही सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.