Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा

Sharad Pawar Dig At PM Modi: जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये शरद पवारांनी थेट मोदींचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं

'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा

Sharad Pawar Dig At PM Modi: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक पद्धतीने टोला लगावला आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या उर्दू अवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन सूचक विधान करत निशाणा साधला. 

कोणता कार्यक्रम होता?

डॉ. मकदूम फारुकी यांनी शरद पवारांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या पुस्तकाच्या उर्दू अनुवादाचे प्रकाशन ज्येष्ठ उर्दू साहित्यिक नुरूल हसनन यांच्या हस्ते हज हाउस येथे शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. आमदार राजेश टोपे, शेषराव चव्हाण, अंकुशराव कदम, डॉ. अब्दुल रशीद मदनी, इलियास किरमानी, ख्वाजा शरफोद्दीन आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी भाषण केल्यानंतर शरद पवारांनी आपलं मनोगत व्यक्त करणारं भाषण केलं. या भाषणामध्ये शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी एका क्षणी आधी भाषण केलेल्या राजेश टोपेंच्या भाषणातील एका वाक्यावरुन मोदींना खोचक टोला लगावला. 

नेमकं काय म्हणाले पवार?

शरद पवार हे आपले गुरु असून त्यांचं बोट धरुन आपण राजकारणात आल्याचं विधान काही वर्षांपूर्वी मोदींनी केलं होतं. याच विधानाचा संदर्भ देत पवारांनी आता असा टोला लगावला की ते वाक्य एकून एकच हशा पिकला. "राजेश टोपे म्हणाले माझं बोट धरून राजकारणात आलो. असं मोदी देखील म्हणाले होते. मात्र मला माझ्या बोटावर विश्वास आहे की ते कुणाच्या हातात दिलं नाही," असं शरद पवार म्हणाले.

नक्की वाचा >> 'कोर्टाने तडीपार केलेली व्यक्ती...', शरद पवारांचा अमित शाहांना टोला; म्हणाले, 'या लोकांच्या...'

... लोकांनी म्हणून धडा शिकवला

सध्य परिस्थितीवर भाष्य करताना, "आज देशाची परिस्थिती बदलली आहे. निवडणुकीची परिस्थिती कशी होती. देशाचे पंतप्रधान त्यांचे सहकारी काय बोलत होते. ते असं बोलतात की देशाची रक्षा त्यातून होत नाही. त्यांनी बंगळूरमध्ये सांगितलं, आम्हाला 400 पार करायचं आहे. त्यांना संविधान बदलायच आहे. देशाचं संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देते ते बदलणं लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे," असं शरद पवार म्हणाले. 

नक्की वाचा >> 'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'

कृषी क्षेत्राबद्दलही भाष्य

"भारत कृषीप्रधान देश मात्र देशात एकेकाळी उपासमारीची वेळ आली. दोन वर्षानंतर देशाची परिस्थिती बदलली. शेतकऱ्यांना आम्ही चांगला भाव दिला. कृषी शास्त्रज्ञांना पाठबळ दिले. तो देश आज गहू तांदूळ जगात दुसऱ्या नंबरचा उत्पादन करणारा देश झाला आहे," असं शरद पवार कृषी क्षेत्राबद्दल भाष्य करताना म्हणाले.

Read More