Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

१७ नोव्हेंबरनंतर शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट

लोकसभा अधिवेशनादरम्यान पवार आणि सोनिया यांच्यात भेटीची शक्यता

१७ नोव्हेंबरनंतर शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या महाशिवआघाडीच एक पाऊल पुढे पडलं आहे. तीनही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आल्याचं जाहीर केलंय. आता हा मसुदा पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार आहे. पक्षश्रेष्ठीच त्यावर निर्णय घेतील असं तीनही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. १७ नोव्हेंबरनंतर लोकसभा अधिवेशनादरम्यान पवार आणि सोनिया यांच्यात भेटीची शक्यता आहे. 

राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार, असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं सांगत निवडून आलेल्या भाजप आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न, मुंबईत आयोजित भाजप, सहयोगी पक्ष आणि भाजपसोबत आलेल्या अपक्ष आमदारांच्या बैठकीत करण्यात आला. तर राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर भाजप लक्ष ठेवून असल्याचं आशिष शेलार यांनी म्हंटलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या महाशिवआघाडीचे सरकार सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील सकारात्मक हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सत्तास्थापनेसंदर्भातील चर्चा सुरु आहेत. रविवारी काँग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होईल असे सांगण्यात येत आहे. पण महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतरच सोनिया-उद्धव भेट होणार आहे.

Read More