Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Swati Mohol Meet Devendra Fadanvis : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर (Pune News) भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच साथीदाराने बेछूट गोळीबार करीत खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद मोहोळवर सलग चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील तीन गोळ्या मोहोळला लागल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Sharad Mohol Wife) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर (Pune News) भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी असून त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शरद मोहोळ देखील राजकारणात येणार अशी चर्चा होती. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री कोणते निर्देश देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि स्वाती मोहोळ यांच्यात काय चर्चा झाली? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

पुणेच नाही तर राज्यात कुठंही टोळीयुद्ध होणार नाही, तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो, त्यामुळे असं टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. 

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींची नावे

साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय 20, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष घवाळकर (वय 20, रा. कोथरुड), रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)

Read More