Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन झालं आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. गुरुवारी सकाळी 9.15 च्या समुमास त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे.

डॉ. अनिल अवचट यांनी मराठी साहित्यामध्ये त्यांची पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचं योगदान दिलं. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. डॉ. अवचट यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.

आज दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

डॉ. अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर गावातील आहे. मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून अनिल अवचट यांची ख्याती होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. अनिल अवचट यांनी दलित, मजूर, भटक्या जमाती वेश्यायांच्या प्रश्नांविषयी लेख लिहिले होते.

Read More