Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोरोना संक्रमणामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात शाळा बंद

Coronavirus​ in western Maharashtra : कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

कोरोना संक्रमणामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात  शाळा बंद

सांगली :  Coronavirus in western Maharashtra : कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय  जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. (Corona Infection - Schools I to VII closed)

कोरोनाचा धोका वाढल्याने सांगली जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात येत आहेत. नववी आणि दहावी मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू आहे. तरीही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन पुढील काळात रुग्णालयातील बेड्स कमी पडू नयेत असा आपला प्रयत्न असला पाहिजे, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

कोरोनाचा संसर्ग उच्चस्तराला पोहोचला की तो हळूहळू कमी होतो, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. कोरोना संसर्ग फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढत जाईल आणि मार्च महिन्यामध्ये तो ओसरेल. राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे थोडीशी भीती लोकांच्यामध्ये आहे. तरी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप यासारखे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून त्वरीत कोविड चाचणी करुन घ्यावी. त्याचबरोबर ज्यांनी अद्यापही  कोविड लस घेतली नाही, ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे अशांनी त्वरीत लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आल आहे.

Read More