Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

उदयनराजेंची शिवेंद्रराजेंना 'जादू की पप्पी'

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी त्यांची गळाभेट घेत शिवेंद्रराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. 

उदयनराजेंची शिवेंद्रराजेंना 'जादू की पप्पी'

सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी त्यांची गळाभेट घेत शिवेंद्रराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. नरेंद्र पाटील यांच्या या जादूच्या झप्पीनंतर रात्री उशिरा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली आणि जादूची पप्पी दिली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील शिवेंद्रराजेंना जादूची पप्पी दिली. या कार्यक्रमात एका उत्साही कार्यकर्त्यानं उदयनराजे हिरा आहेत आणि शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे तुम्ही जोहरी आहात असं म्हणल्यावर, शिवेंद्रराजेंनी आम्ही कधी हिरा व्हायचं असं म्हणल्यावर एकच हशा पिकला.

नरेंद्र पाटील यांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट

लोकसभा मतदारसंघातले शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करत लोकसभेचा अर्ज भरला. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने, एका कार्यक्रमात शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली. एवढ्यावरच न थांबता नरेंद्र पाटील यांनी चक्क एकच राजे, बाबा राजे अशा जोरदार घोषणाही दिल्या. या घोषणाबाजीनंतर शिवेंद्रराजे समर्थकांनीही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

काही दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्या बरोबर एकत्र मिसळ खात, उदयनराजेंना मिसळीच्या तरीचा झटका दिला होता. त्यानंतर आता नरेंद्र पाटलांनी वाढदिवसानिमित्त शिवेंद्रराजेंची गळाभेट घेत घोषणाही दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांची वाढती जवळीक साताऱ्यातल्या वेगळ्या राजकीय समिकरणाची नांदी ठरु शकते. 

Read More