Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

प्रेमभंगानंतर 'फेसबुक' पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

...संकेतनं आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय

प्रेमभंगानंतर 'फेसबुक' पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

धुळे : प्रेमसंबंधातून धुळ्यात एका तरुणानं आत्महत्या केलीय. संकेत गवळी असं मृत तरुणाचं नाव आहे.. आत्महत्येपूर्वी त्यानं स्वताच्या फेसबुक अकाउंटवर सुसाईड नोट लिहीलीय. प्रेयसी बेपत्ता झाल्यानं आत्महत्या केल्याचं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय.

आपल्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नसून आपण स्वेच्छेने हा निर्णय घेतल्याचं संकेतनं आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो... एकमेकांशिवाय जगणं आपल्याला कठीण आहे... तसंच यामुळे कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतोय, हे आपल्या मनाला पटत नसल्याचं संकेतनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 

Read More