Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Political News : ठाकरे गटात दाखल होण्याआधीच NCPच्या माजी आमदाराला ACB ची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Political News : ठाकरे गटाच्या कोकणातील दोन आमदारांची एसीबीची चौकशी करण्यात येत आहे. (Political News) आता दापोली - खेड- मंडणगडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार  संजय कदम (Sanjay Kadam) यांना एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. 

Political News : ठाकरे गटात दाखल होण्याआधीच NCPच्या माजी आमदाराला ACB ची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Ratnagiri Political News : ठाकरे गटाच्या कोकणातील दोन आमदारांची एसीबीची चौकशी करण्यात येत आहे. (Political News) आता दापोली - खेड- मंडणगडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार  संजय कदम (Sanjay Kadam) यांना एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. 2014 ते 2019 या कालावधीत (Sanjay Kadam ACB Inquiry ) आमदार म्हणून असताना स्वतःच्या इमारती, क्रेशर उभारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Political News) याची चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. (Maharashtra News in Marathi) दरम्यान, ठाकरे गटात दाखल होण्याआधीच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. (Maharashra Political News) 

शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम हे शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाकडून संजय कदम यांना पुन्हा शिवसेनेत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतची चर्चाही ऐकायला मिळत होती. ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असतानाच त्यांना ही नोटीस बाजवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचे कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार संजय कदम यांना ओळखले जातात. त्यांना आता एसीबीची (ACB) नोटीस निघाल्याने दापोली मंडणगड विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच याआधी कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी आणि सावंतवाडीचे आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या पीएचीही चौकशी करण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

साळवी यांची सलग सहा तास चौकशी

आमदार राजन साळवी यांची याआधी सलग सहा तास चौकशी करण्यात आली. सहा तासानंतर आमदार राजन साळवी एसीबी कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतरही पुन्हा एसीबी अलिबाग कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. आपल्याला कितीही वेळा बोलावले तरी चौकशीसाठी हजर राहणार आहोत. संपूर्ण कुटुंबाची चौकशी केली तरीही तयार आहोत. माझ्याजवळ संबध नसलेल्या मालमत्तेची देखील एसीबी चौकशी करत आहे. तसेच एसीबीने मागवलेली आणखी माहिती सादर करणार आहोत, असे सांगत साळवी म्हणाले, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह संपूर्ण शिवसेना माझ्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.

Read More