Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सांगली: पराभवाच्या भीतीने सूर्यवंशींचा कांगावा: संदीप सुतार

सांगली महापालिका निवडणुकीतला भाजपचा इच्छुक उमेदवार दिवसाढवळ्या हातात सत्तुर नावाचं हत्यार घेऊन दहशत माजवत असल्याची तक्रार पोलिसांद दाखल झाली होती.

सांगली: पराभवाच्या भीतीने सूर्यवंशींचा कांगावा: संदीप सुतार

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी हे निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने कांगावा करतायत, असा आरोप सुयोग सुतारचा भाऊ संदीप सुतार यानं केलाय. सांगली महापालिका निवडणुकीतला भाजपचा इच्छुक उमेदवार सुयोग सुतार साथीदारासह बाईकवरून येऊन हातात सत्तुर घेऊन दहशत माजवत असल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी केली होती. यानंतर सुतारविरोधात अपहरण, मारहाण, धमकावणे, हे गुन्हे दाखल झाले होते. मात्र पराभवाच्या भीतीने सूर्यवंशी यांनी हा कांगावा केला असून त्यांचे समर्थक गुंडगिरी करतात असा आरोप सुयोग सुतारच्या भावाने केलाय. गेल्या अकरा वर्षांत आपल्या भावावर कोणताही गुन्हा देखील नोंद नसल्याचा दावाही त्याने केलाय.

सुयोग सुतार विरोधात पोलिसात तक्रार

सांगली महापालिका निवडणुकीतला भाजपचा इच्छुक उमेदवार दिवसाढवळ्या हातात सत्तुर नावाचं हत्यार घेऊन दहशत माजवत असल्याची तक्रार पोलिसांद दाखल झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी ही तक्रार केली होती. सुयोग सुतार साथीदारासह बाईकवरून येऊन हातात सत्तुर घेऊन दहशत माजवत असल्याचा उल्लेख तक्रारीत होता. सुतार विरोधात अपहरण, मारहाण, धमकावणे, हे गुन्हे दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सुतारसह चौघांवर गुन्हे दाखल

आपल्या घरासमोर येऊन सुतार हा हातात सत्तुर घेऊन दहशत माजवत असल्याची, तसंच फोनवरून धमकावत असल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी केली आहे. सुतारसह चार जणांविरोधात दोन तक्रारदारांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.

Read More