Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सांगली महापालिका निवडणुकीत काळ्या जादूची चलती

१ ऑगस्टला होणाऱ्या मतदानापुर्वी नागरिकांना काळ्या जादूद्वारे आपल्याकडे खेचण्यासाठी हा प्रकार घडल्याने खळखळ माजली आहे.

सांगली महापालिका निवडणुकीत काळ्या जादूची चलती

सांगली: महापालिका मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना काळ्या जादूने मतदारांना भुलवण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक १९ मध्ये प्रत्येक चौका चौकांमध्ये कच्चे अंडे आणि लिंबू ठीक ठिकाणी आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे. १ ऑगस्टला होणाऱ्या मतदानापुर्वी नागरिकांना काळ्या जादूद्वारे आपल्याकडे खेचण्यासाठी हा प्रकार घडल्याने खळखळ माजली आहे.

दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकीचे वेध लागल्यापासूनच विविध कारणांसाठी ही निवडणूक चर्चेत राहिली आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सुरू असलेल्या रणधुमाळीत एका फलकानेही लक्ष वेधून घेतले होते. प्रचारासाठी मुलं भाड्याने मिळतील असा फलग भर चौकात लावण्यात आला होता. तेव्हाही हा फलक आणि महापालिका निवडणूक हा विषय चर्चेचा ठरला होता. सांगली मिरज कुपवड महापालिका निवडणूक प्रचारसाठी १ हजार रुपये हजेरीने मुलं भाड्याने मिळतील. खालील नंबरवर संपर्क साधा आणि आत्ताच सावकार व्हा अशा आशयाचा हा फलक आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आला आहे.
 

Read More