Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सोन्याच्या वस्तराने २०० रूपयात दाढी करण्यासाठी लोकांची रांग

 सांगली मधील रामचंद काशीद या सलून व्यवसायिकाने सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे.

सोन्याच्या वस्तराने २०० रूपयात दाढी करण्यासाठी लोकांची रांग

सांगली : सांगली मधील रामचंद काशीद या सलून व्यवसायिकाने सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे. रामचंद्र हा दोनशे रुपयात सोन्याच्या वस्तार्याने ग्राहकांची दाढी करत आहे. अनोख्या अशा सोन्याच्या वस्तार्याने दाढी करण्यासाठी आत्ता रामचंद्रच्या उस्तरा मेन्स स्टुडिओत ग्राहकांची गर्दी होत आहे. जो पर्यंत सोन्याचा वस्तरा बनवत नाही, तो पर्यंत स्वतःचे केस आणि दाढी न कापण्याचा पण त्याने केला. सोन्याचा वस्तरा बनवण्यासाठी त्याने अनेक सोनारांशी संपर्क केला. हा सोन्याचा वस्तरा बनवून देण्यासाठी कोणताही सराफ तयार होत नव्हते. पण सांगलीतील चंदूकाका सराफमधील मॅनेजर महावीर पाटील यांनी हा सोन्याचा वस्तरा बनवण्याचं आव्हान स्वीकारलं.

साडे दहा तोळ्याचा वस्तरा 

पुण्यातील मिथुन राणा या कारागिराच्या मदतीने मोठ्या कष्टाने २० दिवसात सेम टू सेम पण साडे दहा तोळ्याचा सोन्याचा वस्तरा अखेर तयार झाला. ह्या सोन्याचा वास्तरा बनवण्यासाठी साडे तीन लाख रुपये इतका खर्च आला आहे. रामचंद्र काशीद याने तीन लाख रुपये खर्च करुन 18 कॅरेटचा आणि साडे दहा तोळ्याचा सोन्याचा वस्तराच बनवला आहे. रामचंद यांचे वडील दत्तात्रय काशीद यांच्या लग्नाच्या ३३ व्या वाढदिवसाला त्यांची सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करून त्याने सुरुवात केली आहे.

बुकिंग सुरू 

सोन्याच्या वस्तार्याने दाढी करण्यासाठी आता रामचंद्र कडे बुकिंग सुरू झालं आहे. या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी त्याच्याकडे मोठी मागणी वाढली आहे. सोन्याच्या वस्तार्याने दाढी करण्यासाठी त्याने दोनशे रुपये दर ठेवला आहे.  दोनशे रुपये इतका जरी ज्यास्त दाढीचा दर तरी, हौशेला मोल नसतं या म्हणी प्रमाणे, सोन्याच्या वास्तर्याने दाढी करण्यासाठी मोठया प्रमाणत तरुण रामचंद्र कडे येऊ लागले आहेत.

Read More