Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जीप विहिरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू

जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू

जीप विहिरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील झरे गावाजवळ जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुष आहेत. हे सर्वजण पारेकरवाडीतील रहिवासी आहेत. 

साताऱ्यातल्या नातेवाईकाच्या अंत्यंसंस्कारासाठी हे सर्वजण चालले होते. यापैकी एकजण गाडीची काच फोडून बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला आहे. मच्छिंद्र पाटील, कुंडलीक बरकडे, गुंडा डोंबाळे, संगीता पाटील आणि शोभा पाटील अशी मृतांची नावं आहेत. आटपाडी पोलीस स्थानकात याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना नेमकी कशी घडली ? याचा तपास सुरु आहे.

Read More