Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

दूध हे लीटरनं विकत घायला पाहिजे, मात्र अनेक दूध संकलन केंद्रावर किलोच्या वजनाप्रमाणे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी केलं जातं. 

सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

सांगली : सांगलीत संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत वैधमापनशास्त्र विभाग कार्यालयाची तोडफोड केली. प्राथमिक दूध संकलन केंद्रातल्या बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्या विरोधात वेळोवेळी वैधमापनशास्त्र विभागाकडे तक्रार करुनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडनं हे आंदोलन केलं. दूध हे लीटरनं विकत घायला पाहिजे, मात्र अनेक दूध संकलन केंद्रावर किलोच्या वजनाप्रमाणे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी केलं जातं. 

त्यामुळे  शेतकऱ्यांच मोठं नुकसान होत असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे.  त्याचबरोबर  वजनात काटे मारी करून मापात घोळ घातला जात असल्याचाही आरोप आहे.

Read More