Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वटसावित्रीच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये- संभाजी भिडे

Sambhaji Bhide Controversial Statement:  वटसावित्री पुजा करताना कसा पेहराव असावा यावर संभाजी भिडे यांनी भाष्य केलंय. 

वटसावित्रीच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये- संभाजी भिडे

Sambhaji Bhide Controversial Statement: आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस त्यांनी वटसावित्री पुजा करताना कसा पेहराव असावा यावर भाष्य केलंय. काय म्हणाले संभाजी भिडे? सविस्तर जाणून घेऊया. 

वटसावित्रीच्या पूजेला नटींनी जाऊ नये, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. ड्रेस परिधान केलेल्या महिलांनीदेखील वटसावित्रीसाठी जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनीच वटसावित्रीला जावं, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. त्यांचा एक ऑडिओ समोर आलाय. त्यामध्ये ते हे विधान करताना दिसत आहेत. 

वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचंय असे ते यावेळी आपल्या समर्थकांना सांगताना दिसत आहेत. 

10 हजरांची तुकडी रोज रायगडावर

गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत, ह्या व्रताची पथ्य आहेत असे ते म्हणतात. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली अशा 10 - 10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणारं असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजरांची तुकडी करायची आहे..संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची असल्याचे ते म्हणाले. 

स्वातंत्र्य मिळालं ते हांडग

यावेळी संभाजी भिडे हे देशाच्या स्वातंत्र्यावर बोलताना दिसतात. आपल्या जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडग आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वतंत्र आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी बजावली नोटीस

पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस बजावली आहे. तुकाराम महाराज पालखी दर्शनावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या अशी नोटीस पोलिसांनी बजावलीये. यापूर्वी संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणली होती, तसंच तेढ निर्माण करणारी भाषणंही केली होती. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस पोलिसांनी त्यांना दिलीय. 

Read More