Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

...तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल - लक्ष्मण हाके

Maratha OBC Reservation: सांगलीमधून आज जनजागृती मिळावे पार पडत आहेत आणि त्या निमित्ताने लक्ष्मण हाके हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.

...तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल - लक्ष्मण हाके

Maratha OBC Reservation:  मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण केलं होतं. यानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्यांवर सहमती दर्शवली. सगेसोयरे, सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे ठाम आहेत. आगामी निवडणूकीत सरकारला इंगा दाखवण्याचा इशारा त्यांनी दिलीया. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेदेखील आक्रमक झाले आहेत. जरांगेंच्या भूमिकेनंतर त्यांनीदेखील आंदोलनाचा इशारा दिलाय. काय सुरुयं वाद? सविस्तर जाणून घेऊया.  

सगेसोयऱ्यांचा अध्यादेशाबाबत राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे,दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीदेखील इशारा दिला आहे. जर आध्यादेश निघाला तर ओबीसी समाजाबरोबर आंबेडकरी जनता देखील मुंबईत धडकेलं,असं ते म्हणाले आहेत. ते सांगली मध्ये बोलत होते.तसेच जरांगेंच्या मोर्चाची पहिली मागणी ही ॲट्रॉसिटी रद्द करण्याची होती. त्यामुळे त्याचा विचार आंबेडकरी जनतेनेदेखील केला पाहिजे,असे मत देखील लक्ष्मण हक्के यांनी व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने जर जीआर काढला तर तो फक्त ओबीसी समाजाला नाही एससी आणि एनटी समाजाला देखील अडचणीचा आहे,असे देखील हक्के यांनी स्पष्ट केले आहे.ओबीसी समाजाच्या जनजागृतीसाठी सांगलीमधून आज जनजागृती मिळावे पार पडत आहेत आणि त्या निमित्ताने लक्ष्मण हाके हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.

काय म्हणाले होते जरांगे?

आमचं सरकारशी काहीही बोलणं झालेलं नाही. आज पूर्ण दिवस त्यांच्याकडे आहे. आजचा दिवस वाट बघू.सरकार मराठ्यांची फसवणूक करतंय का ते बघू. आमचे अजूनही काही टप्पे बाकी असल्याचे जरांगे म्हणाले. आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा लवकरच जाहीर करु. कुणीही विरोध केला तरी सगे सोयरे अंमलबजावणी घेणार, आमचे आणि कुणबी समाजाचे निकष सारखेच आहेत. मराठा पोट जात म्हणून ओबीसीमध्ये घ्या. आमच्या व्हॅलीडिटी करून घ्या,मुद्दामहून ते टाळलं जातंय,काही अधिकारी जाणून बुजून हे देणं टाळतायत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन जरांगेंनी केले. आम्ही जातीयवादी नाही. जातीयवादी कोण आहे हे आरोप करणाऱ्यांनी मागे वळून पाहावं, असे ते म्हणाले. 

विरोधकांनी बैठकीला जायचं होतं. ते आले नाहीं म्हणून तुम्ही आरक्षण न देणं योग्य नाही. तुम्ही सरकार आहात. तुम्ही आरक्षण द्यायलाच हवं. तुम्ही आमच्या पोरांचे बळी घेणार का? तुम्हाला लाज वाटत नाही का? रस्त्यावर लोक उतरतायात हे तुम्हाला दिसत नाही का? सगळ्या जनतेला समान न्याय द्या. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. आरक्षण ही आमची खदखद आहे.आम्ही सगळे उमेदवार संपवून टाकू.मी सरकारला सावध करतोय 100 टक्के तुमचे 288 उमेदवार पाडू, असे आव्हान जरांगेंनी दिलंय. 

सरकारला सत्तेवर मराठ्यांनीच बसवलं आहे.आता विधान परिषदेत जे निवडून आलेत त्यांना मराठ्यांच्या आमदारांनीच मतदान केलं आहे आमच्यावर अन्याय झाला आहे की या आमदारांना पुन्हा लोक निवडून देणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Read More