Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कडकनाथ प्रकरणातून मला राजकारणातून संपवण्याचे षड्यंत्र- सदाभाऊ खोत

 मला राजकारणातून संपवण्याच्या उद्देशाने आंदोलन करत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. 

कडकनाथ प्रकरणातून मला राजकारणातून संपवण्याचे षड्यंत्र- सदाभाऊ खोत

रविंद्र कांबळे, झी मीडिया, इस्लामपूर : कडकनाथ घोटाळ्यावरून आरोप होत असल्याने माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर आज टीकेची झोड उठवली. काही स्वकीय आणि परकीय हितचिंतक हे सातत्याने मैदानात लढण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती, कडकनाथ कोंबडी संस्थेशी संबंधित नाही, त्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही. मला राजकारणातून संपवण्याच्या उद्देशाने आंदोलन करत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ते बोलत होते.

शिखर बँक प्रकरणात आणि साखर कारखाने विक्री प्रकरणात राजू शेट्टी हे मॅनेज झाले, शेट्टी हे अनेकवेळा दिशाभूल करून अनेक वेळा सेटलमेंट केल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. 

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अन्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. यामध्ये रयत ऍग्रो कंपनीने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात रयत ऍग्रो कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घोटाळ्यात माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत असल्याचा आरोप आता होत आहे. या प्रकरणी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका होत असतानाच खोत यांनी कडकनाथ प्रकरणावरून स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे

राजू शेट्टीनी आणि माझ्यात वाद असेल तर, तो आपल्या पुरता वाद असावा, पण शेट्टी हे विनाकारण माझ्या कुटुंबियांना मध्ये घेत असल्याची टीका त्यांनी केली.

कडकनाथ घोटाळा प्रकरणात जर आमच्या विरोधात पुरावे द्यावेत, आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ कडकनाथ कोंबडी घोटाळा समोर आल्यावर, याची चौकशी करावी म्हणून मी सर्वात आधी मागणी केली होती. पण काही लोकांनी विविध माध्यमातून माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा कट रचला. यात काही जवळचे पण लोक सुद्धा होते. 

काही लोकांना हाताशी धरून सातत्याने सागर खोत विषयी अफवा पसरवल्या जात आहेत. मला इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी मिळू नये, आणि जर परत भाजपा सरकार आले तर मला पुन्हा मंत्री व्होवू द्यायचं नाही म्हणून, षडयंत्र रचल आहे.

मंत्री विश्वजित कदम हे जर कडकनाथ घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करणार असतील तर त्यांना हार्दिक शुभेच्छा, त्यांनी अन्य सर्वच घोट्यालयाची चौकशी करावी, असं सांगून सदाभाऊ पुढे म्हणाले, जयंत पाटील हे अनेक वर्षे राजकारणात आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत, त्यामुळे ते सत्यता पडताळण्याचं भान ठेवतात, म्हणूनच बहुतेक त्यांनी कडकनाथ विषयी आजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Read More