Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर फिल्मी स्टाईल दरोडा!

सोलापुरात बार्शी कुर्डुवाडी रोडवर ओरडा पुलावर रात्री दरोडेखोरांनी मोठी लूटमार केल्याचं समोर येतंय. 

बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर फिल्मी स्टाईल दरोडा!

सोलापूर : सोलापुरात बार्शी कुर्डुवाडी रोडवर ओरडा पुलावर रात्री दरोडेखोरांनी मोठी लूटमार केल्याचं समोर येतंय. 

बार्शी - कुर्डुवाडी रोडवर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना अडवून सिनेस्टाईल केली लूटमार करण्यात आली.

हातात शस्त्रे घेऊन दरोडेखोरांच्या टोळीने वाहने थांबवून प्रचंड दहशत माजवली. तब्बल नऊ प्रवासी वाहने दरोडेखोरांनी लुटली. 

प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड पळवली. या घटनेनंतर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Read More