Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharashtra : स्वाइन फ्लूचा धोका वाढला, 142 जणांना बाधा तर 7 जणांचा मृत्यू

 swine flu infections in Maharashtra : राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होऊ लागला असून आतापर्यंत 142 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला.  

Maharashtra : स्वाइन फ्लूचा धोका वाढला, 142 जणांना बाधा तर 7 जणांचा मृत्यू

मुंबई :  swine flu infections in Maharashtra : राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होऊ लागला असून आतापर्यंत 142 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला.  

पावसाळा सुरु होताच स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. राज्यात 8 जूनपर्यंत 8 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती, तर शून्य मृत्यूची नोंद होती. जुलैपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर या आजाराचा संसर्ग वाढला आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचे 126 रुग्ण आढळून आलेत. या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले.

राज्यात  H1N1 (स्वाइन फ्लू) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे, असे महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सादर केलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. या वर्षी 21 जुलैपर्यंत स्वाइन फ्लूचे 142 बाधित झाले आहेत. कोल्हापुरात तीन आणि पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.मुंबईत स्वाइन फ्लूचे 43 तर पुण्यात 23 आणि पालघरमध्ये 22 आहेत. नाशिकमध्ये 17 आणि नागपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 14, ठाण्यात सात रुग्ण आहेत.

दरम्यान,  स्वाइन फ्लू रुग्णांबाबत आम्ही लक्ष ठेवण्यासाठी योग्य ती कारवाई करत आहोत. प्रतिबंध आणि नियंत्रण उपाय लागू केले जात आहेत, असे माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

Read More