Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शाळा सुरु करण्याबाबत आताची मोठी बातमी, राज्य सरकारने घेतला हा निर्णय

 Reopen school in Maharashtra :कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात सुरु करण्यात आलेल्या शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.  

शाळा सुरु करण्याबाबत आताची मोठी बातमी, राज्य सरकारने घेतला हा निर्णय

मुंबई :  Reopen school in Maharashtra :कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात सुरु करण्यात आलेल्या शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ( Maharashtra Government allows to Reopen school )

शाळांबरोबर महाविद्यालये सोमवारपासून सुरु

राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय  सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे यावेळी मंत्री वर्षा गायकवडा यांनी सांगितले. 

तसेच स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारच्या निर्णयानंतर 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सरसकट शाळा सुरु होणार नसल्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहेत.

Read More