Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

विधिमंडळ अधिवेशन चौथा दिवस 'या' मुद्द्यांवरुन रंगणार

मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी शिफारस

विधिमंडळ अधिवेशन चौथा दिवस 'या' मुद्द्यांवरुन रंगणार

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चौथ्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी शिफारस करणारा ठराव मांडला जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हा ठराव मांडणार असून तो मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. 

दुसरीकडे विधानभवनाच्या आवारात मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान काल सावरकरांच्या मुद्यावर सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे विरोधक आज अधिवेशनात काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. 

पहिले दोन दिवस शेतकरी प्रश्न आणि नंतर सावरकरांच्या मुद्यावर अधिवेशनात विरोधकांनी गोंधळ घातला होता. अधिवेशनाचे आधीचे तीन दिवस अनेक मुद्द्यांनी रंगले.

महत्वाचे निर्णय 

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aaghadi) आज मराठी भाषा (Marathi language) दिनाच्या पूर्वसंध्येला मोठा निर्णय घेतला. यापुढे सर्व शाळांमध्ये मराठी (Marathi ) भाषा शिकवणे राज्य सरकारने सक्तीचे केले आहे.

खासगी शाळा मनमानी शुल्क वाढवतात त्यासाठी शुल्क नियंत्रण समिती स्थापन करणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

राज्यातील पोलीस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

Read More