Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जाग

पंचायत राज समितीच्या नावाखाली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जाग

रत्नागिरी : पंचायत राज समितीच्या नावाखाली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  एका जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकडून पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. समितीच्या खर्चाच्या नावाखाली कर्मचा-यांकडून या पैशांची वसुली केली जात आहे. मार्च महिन्याचे पगार अजूनही झालेले नसताना प्रत्येक कर्मचा-याकडून २० ते २५ हजार रुपयांची वसुली करण्यात येत आहे. पंचायत समितीला पाच लाख, तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाला दहा लाख रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं गेल्याचंही यातून पुढं आलंय. 

Read More