Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी

Jaitapur Power Project : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी समोर हाती आली आहे. 

रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी

रत्नागिरी : Jaitapur Power Project : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी समोर हाती आली आहे. स्थानिक आणि शिवसेनेच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागणार आहे, आता स्पष्ट झाले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पात सहा न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर बसवण्यास केंद्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे. (Jaitapur Power Project : Central Government approves installation of six nuclear reactors)

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक आहे. त्यामुळे तो कोकणात नको, असे सांगत जैतापूर आणि आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थानी तीव्र विरोध केला. ग्रामस्थांच्या बाजुने शिवसेनाही आंदोलनात उतरली. मात्र, आता हा प्रकल्प होण्याचे संकेत मिळाले आहेत. अणुऊर्जा खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली की, या अणुऊर्जा प्रकल्पात सहा न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर बसवण्यास केंद्र सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. हा रखडलेला जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्यातून 1650 मेगावॅट क्षमतेचे सहा न्यूक्लीअर रिअ‍ॅक्टर लावण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. 9900 मेगावॅट क्षमतेचा हा देशातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला.

जैतापूर प्रकल्पाबाबत स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल, असे शालेय शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर शिवसेना विरोधाचं नाटक करत असल्याची टीका माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Read More