Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Panchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा

 Panchayat Election Result 2022: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला.  

Panchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा

Maharashtra Panchayat Election Result: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तब्बल 24 ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरे गटाची सत्ता तर शिंदे गटाला केवळ ७ ग्रांमपंतायतींमध्ये यश मिळाले. गाव पॅनलच्या 17 ग्रांमपंचायती नेमक्या कुणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. रत्नागिरी, लांजा राजापूर मतदार संघात उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा करिष्मा दिसून आला. दक्षिण रत्नागिरीत 18 जागांवर ठाकरे गटाचा दबदबा दिसून आला.

या निवडणुकीतील यशानंतर पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे यांचा राजन साळवी यांना फोन केला. त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. राजापूर - लांजा मतदार संघात ग्रामपंचायत निवडणूकमध्ये मिळवलेल्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी साळवी यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले.

तर गुहागर तालुक्यात ठाकरे गटाने वर्चस्व कायम राखले आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वच ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली. भाजपच्या ताब्यातील दोन ग्राम पंचायतीही ठाकरे गटाने आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरीत एकूण ग्रामपंचायत 51 साठी मतदान झाले. यात  ग्रामपंचायती ३६ बिनविरोध  झाल्यात. शिवसेना 24 तर शिंदे गट 7 आणि भाजपला केवळ एका जागेवर यश मिळाले. राष्ट्रवादीला दोन आणि अन्य 17 जणांना यश मिळाले. काँग्रेला यश मिळालेले नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल

रत्नागिरी तालुका 
1 . शिरगांव - सरपंच महाविकास आघाडी 
2. फणसोप - ठाकरे गट 
3 . चरवेली - गाव पॅनल ( बिनविरोध )
4 . पोमेंडी बुद्रुक - ठाकरे गट 

लांजा तालुका 
1 . शिरवली - ठाकरे गट ( बिनविरोध )
2 . रिंगणे - गाव पॅनल 
3 . कोचरी - ठाकरे गट ( बिनविरोध )
4 . गवाणे - ठाकरे गट 
5 . वेरवली - ठाकरे गट 
6 . देवधे - ठाकरे गट 
7. कोर्ले - गाव पॅनल 
8 . गोवीळ - राष्ट्रवादी काँग्रेस 
9 . प्रभानवल्ली - गाव पॅनल 
10 . व्हेळ - राष्ट्रवादी काँग्रेस 
11 . कोंड्ये - ठाकरे गट 
12 . झापडे - ठाकरे गट 
13. उपळे - गाव पॅनल 
14 . हर्चे - ठाकरे गट 
15 . कोलधे - गाव पॅनल 

 राजापूर तालुका
1 . सागवे - ठाकरे गट 
2 . देवाचे गोठणे - गाव पॅनल( बिनविरोध )
3 . वडदहसोळ - ठाकरे गट ( बिन विरोध )
4 . आंगले - ठाकरे गट 
5 . भालावली - भाजप 
6 . केळवली -ठाकरे गट (बिनविरोध) 
7 . मूर -ठाकरे गट (बिनविरोध )
8 . राजवाडी - गाव पॅनल 
9  . मोगरे - ठाकरे गट ( बिनविरोध )
10. कोंडये तर्फे सौदळ - ठाकरे गट 

संगमेश्वर तालुका
1 . कोंड असुर्डे - ठाकरे गट 
2  . आंबेड बुद्रुक - गाव पॅनल 
3 . असुर्डे - ठाकरे गट 

चिपळूण तालुका 
1 . फोपळी - गाव पॅनल (बिनविरोध)

 गुहागर तालुका
1 .अंजनवेल - ठाकरे गट 
2 . वेलदूर - ठाकरे गट 
3 . वेळंब -गाव पॅनल ( बिनविरोध)
4 . परचुरी - गाव पॅनल ( बिनविरोध )
5 . छिंद्रावळे - गाव पॅनल 

 खेड तालुका
1 . असगणी - ठाकरे गट 
2 . आस्तान - शिंदे गट 
3 . नांदगाव - ठाकरे गट 
4 . सुसेरी - गाव पॅनल 
5 . तळघर - शिंदे गट (( बिनविरोध ))
6 . वडगाव - शिंदे गट (( बिनविरोध ))
7 . देवघर - शिंदे गट 

 दापोली तालुका
1 . इनामपांगरी - गाव पॅनल 
2 . गावतळे - गाव पॅनल 
3 . फणसू - शिंदे गट ( बिनविरोध )
4 . नवसे - गाव पॅनल ( बिनविरोध)

 मंडणगड तालुका
1 . घराडी - शिंदे गट 
2 . निगडी - शिंदे गट

सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील निकाल

 सिंधुदुर्गातील एकूण चार ग्रामपंचायत निवडणुकीपैकी तीन निकाल हाती आले आहेत. त्यातील दोन ग्रामपंचायत वर भाजपचे वर्चस्व तर एक ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे गेली आहे. यात दोडामार्ग तालुक्यातील पाटये पुनर्वसन ग्रामपंचायत व देवगड तालुक्यातील मळेगाव ग्रामपंचायत भाजपकडे तर देवगड तालुक्यातील पडवणे ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे गेली आहे.

Read More