Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रत्नागिरीत शहर बसला अपघात, २३ शाळकरी मुले जखमी

रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे शहर बसला अपघात झाल्याने २३ शाळकरी मुले जखमी झालीत. 

रत्नागिरीत शहर बसला अपघात, २३ शाळकरी मुले  जखमी

रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथे शहर बसला अपघात झाल्याने २३ शाळकरी मुले जखमी झालीत. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कासारवेलीहून शहर बस रत्नागिरीकडे येत असताना  झाडगाव लघुउद्योग वसाहत रोडवर हा अपघात झाला.  या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 

रत्नागिरीत अनेक रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडलेले आहेत. तसेच काही ठिकाणी रस्तेही खचलेले आहेत. कासारवेळी - रत्नागिरी मार्गावरही असेच खड्डे आहेत. याचा फटका या शहर बसला बसला. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस कलंडली. या बसमधून २३ विद्यार्थी प्रवास करीत होते. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बचाव कार्यास सुरुवात केली. 

Read More