Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

फोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला होणार राज्याच्या नवीन पोलिस महासंचालक!

Director General of Police : काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट  राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.

फोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला होणार राज्याच्या नवीन पोलिस महासंचालक!

Rashmi Shukla News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्तात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षापासून वादात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांना महायुती सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे. रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक होणार असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट  राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्य़ा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. 

फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय?

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांचं नाव घेतलं जातं. रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागात आयुक्तपदावर असताना बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. फडणवीस सरकार सत्तेत असताना आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देखील बेकायदेशीर फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करण्यात आले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीकेसी सायबर पोलिसांनी 26 मार्च 2021 रोजी अधिकृत गुपित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि लीकची चौकशी सुरु केली. त्यावेळी मार्च 2022 मध्ये सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवला गेला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 24 जणांचे जबाब नोंदवले आहेत. सीबीआयने दंडाधिकार्‍यांसमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर त्यांना रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील मुंबई आणि पुण्यातील गुन्हे रद्द करण्यात आले आहेत.

आणखी वाचा - Maharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत

दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी म्हणून काम पाहिलंय. त्यानंतर त्यांची राज्य गुप्तचर विभागात (SID) आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्याचवेळी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाला होता. फोन टॅपिंग प्रकरण त्यावेळी बाहेर आलं होतं.

Read More