Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

LokSabha Elections 2019 : भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेत, पालघरमधून निवडणूक रिंगणात

भाजप खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून शिवसेनेच्या तिकिटावर गावित आता लढणार आहे.  

LokSabha Elections 2019 : भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेत, पालघरमधून निवडणूक रिंगणात

मुंबई : भाजप खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून शिवसेनेच्या तिकिटावर गावित आता लढणार आहे. पालघरची जागा शिवसेनेने भाजपकडे मागितली होती. भाजपने ही जागा युती टिकविण्यासाठी शिवसेनेला सोडली. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित हे विजयी झाले होते. त्यामुळे गावित यांचे करायचे काय, असा प्रश्न भाजपला पडला होता. आता गावितच शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेने येथून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणुकीत जोरदार लढत दिली होती. पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख यांनी श्रीनिवास वनगा यांना आपण २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी देऊ आणि संसदेत पाठवू असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळणार का, याची उत्सुकता होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांना संसदेत पाठवणार असल्याचे म्हटले आहे.

पालघरमधून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशाच्या सोहळ्याला भाजपमधून शिवसेनेत गेलेले श्रीनिवास वनगाही उपस्थित होते. तर श्रीनिवास यांना संसदेत पाठणार असल्याचा शब्द दिलाय. त्यामुळे शब्द पाळणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता श्रीनिवास यांची कशी राजकीय सोय लावणार याकडे लक्ष आहे.

Read More