Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

"शिवसेना आमदार फुटण्याची आणि राज ठाकरे बाहेर पडण्याची कारणं सारखीच"; काय म्हणतायत मातोश्रीतल्या कुटुंबाबाबत राज ठाकरे

शिवसेना फुटण्याला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असेही राज ठाकरे म्हणाले

Raj Thackeray Exclusive Interview : राज्यात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना एकत्र घेत शिवसेना पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केले होते. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करण्यात येत आहेत. 

तर दुसरीकडे भाजपनेच शिवसेना फोडली असाही आरोप विरोधकांकडून केला जात आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे.

शिवसेना फुटण्याला उद्वधव ठाकरेच जबाबदार - राज ठाकरे

त्या दिवशीच माझ्याकडे देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. जी गोष्ट घडली आहे त्याचं उगाच फुकटचं श्रेय नका घेऊ नका म्हटलं असं मी त्यांना म्हटलं. जी गोष्ट घडली आहे, ती तुम्ही किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी घडवली नाही. याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं श्रेय कसं काय काढून घेऊ शकता? कारण त्यांच्यामुळे हे काय एकदा घडलं नाही, असे राज ठाकरे म्हणाले. 

पक्ष फुटण्यामागे संजय राऊतचा काय संबंधं?

सगळ्यांनी संजय राऊतांना झोडून काढलं. यामध्ये संजय राऊतचा काय संबंधं? मी समजू शकतो रोज ते टेलिव्हिजनवर यायचे, रोज काही ना काही बोलायचे ज्याने माणसं इरिटेट होऊ शकतात. पण त्याने काय आमदार फुटत नसतात, असेही राज ठाकरे म्हणाले.

आमदार फुटण्याला कारणीभूत आणि मी बाहेर पडलो त्या वेळेला कारणंही तीच होती. आज आमदार फुटण्याची कारणं तीच आहेत. मध्यंतरीच्या काळात जे लोक सोडून गेले त्याची कारणं तीच आहेत. पण ही कारणं देखील मी त्यावेळेला मी बाळासाहेबांना सांगत होतो, असे राज ठाकरे म्हणाले 

Read More