Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.

Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

Raj Thackeray On Devendra Fadnavis: गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याचं पहायला मिळतंय. राजकीय वर्तुळात टीका प्रत्युत्तर या गोष्टींची रिघ लागल्याचं दिसून येतं. अशातच लोकमतच्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरं दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज ठाकरे यांची मुलाखत (Raj Thackeray Interview) घेतली. राज ठाकरे यांच्या नावातच 'राज' आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्षांची ओळख करून दिली.

अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. मात्र, राज यांनी आपल्या शैलीत षटकार ठोकले. मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांच्या रॉपिड फायर राऊंडमध्ये अमृता फडणवीस यांनी राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला. काकांकडेही लक्ष द्या, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जरा जपून राहण्याचा सल्ला दिला. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्ला देण्याचं राज ठाकरे यांनी टाळलं. उद्धव ठाकरे स्वयंभू आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोले लगावला.

आणखी वाचा - देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला

दरम्यान, स्वत:ची बायोपिक काढली तर कोण अॅक्टर असावा, असं वाटतं? असा सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला. माझ्यावर कशाला, लतादीदी, इंदिरा गांधी यांसारख्या दिग्गजांवर करावा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तर यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर सिनेमा येणार असल्याचं देखील सांगितलं. तर या सिनेमामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार काम करणार असल्याचं वक्तव्य केलंय.

Read More