Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी

राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी

मुंबई : राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाचे पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. मुंबईसह कोकणात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र सॅटेलाईट आणि रडारने टिपलेल्या नव्या चित्रांनतर मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी प्रशासनासह नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना कऱण्यात आल्या आहे. 

दरम्यान, मुंबईसह उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार पावसानंतर शहरातील सखल भागात पाणी भरलं होते. परळ, हिंदमाता, भायखळा, सायन किंग्ज सर्कल या परिसरात रस्त्यावर पाणी साचलं होतं. काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेकांचं नुकसान झाले आहे. 

राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. पुण्यात काल संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी भरल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. चंदन नगर, सहकार नगर, दगडूशेठ मंदिराजवळील शिवाजी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झालं. तर चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी भरलं. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Read More