Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भंडारा उधळत नाचवल्या नंग्या तलवारी

 सरसगड ( Sarasgad) इथल्या कार्यक्रमात नंग्या तलवारी (Swords ) नाचवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

भंडारा उधळत नाचवल्या नंग्या तलवारी

अलिबाग : रायगडमधून (Raigad) गेलेल्यांनी सरसगड ( Sarasgad) इथल्या कार्यक्रमात नंग्या तलवारी (Swords ) नाचवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वेध सह्याद्री प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. त्यावेळी हा प्रकार पुढे आला. नंग्या तलवारी नाचविल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

रविवारी पाली जवळच्या सरसगडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भंडारा उधळत काहींनी नंग्या तलवारी नाचवल्या. तलवारी नाचवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमाला वनविभागाची लेखी परवानगी घेण्यात आलेली नव्हती. याचीही चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, पाली पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Read More