Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते'; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

'राऊंतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट राहुल कनाल यांनी केला आहे. घोटाळ्यांबाबत राऊतांनी केलेले आरोप खोटे ठरले तर राऊत राजकारण सोडणार का? अस आव्हान कनाल यांनी दिले आहे. 

'संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते'; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: राज्यभरात अनेक नेते मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत. यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. शिंदे गटाच्या राहुल कनाल (rahul kanal) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.  संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

संजय राऊता यांनी कोरोना काळात सामानाच्या ऑफिसमध्ये 16 आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत संजय राऊत यांनी आपण मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असल्याच सांगितलं होतं असा खळबळजनक दावा राहुल कनाल यांनी केला. याबाबत सामना ऑफिसचं सीसीटीव्ही फूटेज आणि दोघांचा तीन वर्षांचा सीडीआर चेक करावा असं आव्हानही राहुल कनाल यांनी दिले आहे.

राहुल कनाल यांच्यावर संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्याच नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केलाय. या नेत्यांची नावं घेण्याची हिम्मत ईडी आणि किरोट सोमय्यांमध्ये आहे का असा सवाल राऊतांनी विचारला. घोटाळा केलाच तर हिशेब तर द्यावाच लागणार असा पलटवार किरीट सोमय्यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या आरोपांवर शिंदे गटाचा पलटवार

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना शिंदे गटाचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी प्रत्युत्तर दिलंय. घोटाळ्यांबाबत राऊतांनी केलेले आरोप जर खोटे ठरले तर राऊत राजकारणातून निवृत्ती घेतील का असं असं खुलं आव्हान कनाल यांनी दिले आहेत.  

कोण आहेत राहुल कनाल?

राहुल कनाल हे ठाकरे गटात असताना युवासेनेचे पदाधिकारी होते. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखळे जायचे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर राहुल कनाल शिंदे गटात सहभागी झाले. ठाकरे गचासाठी हा मोठा धक्का होता. 

आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप 

महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा झालाय. पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूने ७६ टक्के मतं पडली आहेत. 1800 सदस्यांपैकी 708 सदस्यांनी यातली 540 मतं थीम पार्कच्या बाजूनं पडली. रेसकोर्सच्या भाडेकराराचे नुतनीकरण करून 226 पैकी 120 एकर जागेवर महापालिकेतर्फे थीम पार्क उभारण्यात येणार आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रेसकोर्सची जमीन बळकावण्याचा सरकारचा प्रयत्न असून, शिंदेंचे निकटवर्ती विकासक व्यवस्थापनाला धमकावत असल्याचाही आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Read More