Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अजगराकडून हरणाची शिकार; थरारक व्हिडिओ व्हायरल

डोळ्यांची पापणी हलते न हलते तोपर्यंतच...

अजगराकडून हरणाची शिकार; थरारक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अजगराने मोठ-मोठ्या प्राण्यांची शिकार केल्याचं अनेकदा पाहण्यात किंवा ऐकण्यात आलं आहे. अशाच प्रकारे अजगराच्या शिकारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. डोळ्यांची पापणी हलते न हलते तोपर्यंतच अजगराने हरणावर झडप घालून त्याची शिकार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

ही घटना महाराष्ट्रातील Central Chanda Division, Maharashtra असल्याचं बोललं जात आहे. एका तलावाच्या किनारी हरिण पाणी पित असल्याचं व्हिडिओत दिसतंय. पाणी पित असताना अचानक अजगर हरणावर हल्ला करतो. 

अजगर-हरणाचा हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 

  

काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारची आणखी एक घटना समोर आली होती. अजगर झाडाच्या पाठी लपला होता, बिबट्या जवळ येताच अजगराने बिबट्यावर हल्ला केला होता. काही वेळ सुरु असलेल्या झटापटीनंतर बिबट्याने अजगरावर मात करत त्यालाच भक्ष्य केलं होतं. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Read More