Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठिकठिकाणी हिंसक वळण

भोर, सिंधुदुर्ग, तसंच रत्नागिरीतही एसटी गाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्यात. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठिकठिकाणी हिंसक वळण

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय... भोर, सिंधुदुर्ग, तसंच रत्नागिरीतही एसटी गाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्यात. कुडाळ ते मालवण मार्गावर धावत असलेल्या एसटीच्या काचेवर दगड मारल्यानं एसटीचं किरकोळ नुकसान झालंय. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील पिसई गावाजवळ शिवशाही बसवर दगडफेक झाली. तर भोर टेपोमधील मुक्कामी एसटीवर काल रात्री दगडफेक करण्यात आली... रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. या एसटीवर तिन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read More