Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!

Pune University Staff Corruption Video : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचं पहायला मिळतंय.

Pune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!

SPPU Staff Collect Money From Students : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) गेल्या काही दिवसांपासून गोंधळाचं वातावरण असल्याचं समोर येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची निवड करण्यात आली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे ? असा प्रश्न उपस्थित करत मोठा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुणे विद्यापीठातील खळबळजनक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी (Mark Sheet) विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे उकळवत (Pune University Staff Corruption) असल्याचं दिसतंय. मार्कशीटसाठी चार हजार रुपये मागितल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी अभाविपकडे केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्याचं ठरवलं. त्यानंतर नोटांचे नंबर नोंद केले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला त्याच नोटांसह पकडलं. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा परीक्षा विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. एका कर्मचाऱ्याला मार्कशीट देण्यासाठी लाच घेताना आज अभाविप विद्यापीठ अध्यक्ष रंगा महादेव व कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. दिवसेंदिवस परीक्षा विभागाचा भ्रष्टाचार भोकावळत आहे. आता विद्यापीठ प्रशासन कोणती कारवाई करते ते पाहू. मागील वेळी एक बडा अधिकारी यातून वाचला आहे. सर्वसामान्य, गोरगरीब विद्यार्थ्यांची लुटमार करण्याचे काम प्रशासनाने हातात घेतले आहे असे दिसते, असं अभाविपचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

पाहा Video

दरम्यान, परीक्षा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी माहणी अभाविपकडून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील दिला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. विद्येच्या माहेरी नेमकं चाललंय का? असा सवाल आता विचारला जात आहे. 

Read More