Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Breaking : पुण्यातलं Sex tantra शिबिर अखेर रद्द करण्याचा निर्णय

नवरात्रौत्सवात पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचं करण्यात आलं होतं आयोजन

Breaking : पुण्यातलं Sex tantra शिबिर अखेर रद्द करण्याचा निर्णय

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात  सेक्स तत्रं शिबिराची जाहिरत (Sex Tantra Camp) सोशल मिडियात (Social Media) व्हायरल झाली आणि या जाहिराताच्या (Advertise) पोस्टरने पुण्यात धुमाकूळ घातला.  विद्येचं माहेघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात काय सुरू आहे हा प्रश्न निर्माण झाला. झी 24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर अखेर पुण्यातील सेक्स तंत्र शिबिर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) ही माहिती दिली आहे. 

सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशने (Satyam Shivam Sundaram Foundation) हे शिबिर आयोजित केलं होतं. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने  'सेक्स तंत्र' (Pune Sex Tantra Advertise) या नावाने तीन दिवसांचा एक कोर्स आयोजित करण्यात आल्याची ही जाहिरात होती. 1, 2 आणि 3 ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात (Pune Camp Area) हा कोर्स आयोजित करण्यात येणार असल्याचं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं होतं. 

काय होतं या जाहिरातीमध्ये?
यंदाच्या नवरात्रीच्या (Navratri 2022) निमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरात तीन दिवसांचा सेक्स तंत्र या नावाच्या एका कोर्सचे आयोजन करण्यात आल्याचं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं होतं. या कोर्समधे सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून तीन दिवसांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये आकारले जाणार होते.   'सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन' या संस्थेतर्फे या कोर्सचं आयोजन करण्यात आलं असल्याचं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. या जाहिरातीबरोबर एक क्यूआर कोड देखील देण्यात आला असून ज्याद्वारे आयोजकांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

या कोर्समधे पुढील कोर्स शिकवले जाणार होते
- वैदिक सेक्स तंत्र 
-डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एंबॉडीमेंट 
-चक्र अॅक्टिव्हेशन 
-ओशो मेडिटेशन 

जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या नंतर पुण्यात मनसे- आणि हिंदु संगठना आक्रम झाल्या. 

पुणे सायबर पोलिसांनी याची चौकशी सुरु केली.. या कोर्सच्या आयोजकांची माहिती पोलीस शोधत आहेत. या जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुन आयोजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.  त्याचबरोबर ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचाही सायबर पोलीस शोध घेत आहेत.

Read More