Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुण्यात रिक्षा चालक आक्रमक, रिक्षा वाहतूक केली बंद

पुणे येथील रिक्षा चालकांनी रिक्षा वाहतूक बंद केली आहे.  

पुण्यात रिक्षा चालक आक्रमक, रिक्षा वाहतूक केली बंद

पुणे : येथील रिक्षा चालकांनी रिक्षा वाहतूक बंद केली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल झाले आहेत. कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था मर्यादित स्वरुपात सुरु आहे. मात्र, रिक्षा वाहतूक असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला होता. परंतु रिक्षा वाहतूक बंद असल्याने याचा त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात वाढत आहे. त्यामुळे काही निर्बंध आहेत. तसेच कोरोनाच्या काळात आणि लॉकडाऊनच्या काळात रिक्षा व्यवसाय बंद होता. त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. कर्जाचे हप्ते कसे भरायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता रिक्षातून कोविड-१९ नियमाप्रमाणे वाहतूक करण्याची अट आहे. त्यामुळे रिक्षाला म्हणावे तसे ग्राहक मिळत नाही. त्यामुळे दिवसाचा व्यवसायही कमी होतो. त्यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी, अशी रिक्षा चालकांची मागणी आहे.

रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, लॉकडाऊनकाळात दरमहा १४ हजार वेतन मिळावे, लॉकडाऊन काळातील रिक्षावाहन कर्जाचे हप्ते सरकारने भरावे आदी मागण्या रिक्षा चालकांनी केल्या आहेत. तसेच चार महिन्यांच्या विमा हप्त्याचा परतावा मिळावा, रिक्षाचा मुक्त परवाना रद्द करावा आणि रिक्षातून तीन प्रवाशांच्या प्रवासासाठी परवानगी द्यावी या मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी आपला बंद पुकारला आहे.

रिक्षा चालकांच्या मागण्या

- रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे
- लॉकडाऊनकाळात दरमहा १४ हजार वेतन मिळावे
- लॉकडाऊन काळातील रिक्षावाहन कर्जाचे हप्ते सरकारने भरावे
- चार महिन्यांच्या विमा हप्त्याचा परतावा  मिळावा
- रिक्षाचा मुक्त परवाना रद्द करावा
- रिक्षातून तीन प्रवाशांच्या प्रवासासाठी परवानगी द्यावी 

6\

Read More