Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune News : खळबळजनक! पुण्यात दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला?

इयत्ता दहावीची परीक्षा सुरु असून, सध्या विद्यार्थ्यांच्या नजरा परीक्षेच्या अंतिम पेपरकडे लागल्या आहेत. असं असतानाच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात दहावीचा गणित भाग एकचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पेपर महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Pune News : खळबळजनक! पुण्यात दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला?

Pune News : इयत्ता दहावीची परीक्षा सुरु असून, सध्या विद्यार्थ्यांच्या नजरा परीक्षेच्या अंतिम पेपरकडे लागल्या आहेत. असं असतानाच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात दहावीचा गणित भाग एकचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पेपर महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

बिबवेवाडीत यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 13 मार्चला गणित भाग 1 हा पेपर होता. यावेळी सुरक्षा रक्षक मनिषा कांबळेने परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढल्याची माहिती मिळत आहगे. पुढे 15 मार्चला बोर्डाचं पथक तपासणीसाठी विद्यालयात गेलं असता आरोपी महिलेवर पथकाला संशय आला. यानंतर तिच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली, ज्यामधून गणित भाग एक प्रश्नपत्रिकेचे फोटो तिनं काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Rain : मुंबईत पुढील 3- 4 दिवस पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना 

 

fallbacks

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली असून फक्त गणितच नव्हे तर इतर दोन विषयांचेही पेपर फुटले असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात आढळून आलं आहे. पोलिसांना गणिताव्यतिरिक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर फुटले असल्याची माहिती मिळाली आहेय. गणिताशिवाय, आणखी दोन पेपर फुटले असल्याचे पुरावे सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून देण्यात येत आहे. 

मुंबईतील दादरमध्येही घडलेला असाच प्रकार...

मुंबईच्या दादरमध्ये असणाऱ्या डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्येही असाच प्रकार घडला होता. जिथं इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याचं उघडकीस आलं होतं. इथं विद्यार्थांना परीक्षाकेंद्रात जाण्यासाठी 23 मिनिटं उरलेली असतानाच  एका विद्यार्थ्याला व्हॉट्सअॅपवर गणिताची प्रश्नपत्रिका आली होती. पोलिसांनी या संदर्भात चौघांवर गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये तीन विद्यार्थ्यांसह एका शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. 

प्रश्नपत्रिकेतच छापून आलं होतं उत्तर ... 

आणखी एका धक्कायादयक घटनेनं सर्वांच्याच नजरा वळवल्या होत्या, जिथं बोर्डाच्या परीक्षेत चक्क प्रश्नपत्रिकेतच उत्तर छापून आलं होतं. इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला प्रश्नपत्रिका हातात येताच विद्यार्थीसुद्धा भांबावले होते. ज्यामुळं शिक्षण मंडळाकडून झालेल्या या चुकीवरूनही टीकेची झोड उठवण्यात आली होती. 

 

 

Read More