Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पाणीकपातीचं संकट पुणेकरांवर घोंगावत होतं. पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या खडकवासला धरणात या तारखेला 19.28 टीएमसी पाणीसाठा असतो. यंदा तो जवळपास 16.28 टीएमसी पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे शहराला पुढील किमान 5 महिने पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन पुणे महापालिकाला करावं लागणार आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कालवा समितीची बैठक घेतली.  त्यात पाणी कपातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. . (Pune News Important news for Pune Big decision regarding water reduction no water cut in pune)

या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला असून पाणीकपात न करण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. त्यामुळे भर उन्हात पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट तुर्तास टळलंय. गेल्या काही महिन्यापासून पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं होतं. गेल्या 25 वर्षांतील सर्वात कमी पाऊस यंदा पुणे जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात कमी पावसामुळे पाणी साठा कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी संकट आणि शेती पाण्याशिवाय कशी होणार अशी चिंता पडली होती. पण कालवा समितीची बैठकीतील निर्णयामुळे पुणे शहरात पाणी कपातीची संकट टळलं आहे. तर शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडण्यात येणार आहे. पहिलं आवर्तन 3 मार्चपासून सुरू होणार असून शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

 

Read More